News Of Maharashtra

इराणच्या हल्ल्यांनंतरही अरब देश शांत का? प्रतिहल्ला न करण्यामागची ‘ही’ आहेत ३ मुख्य कारणे

दुबई/रियाध: मिडल ईस्टमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने संयुक्त अरब अमिराती (UAE), कतार, कुवेत, बहरीन आणि सौदी अरेबिया या देशांना लक्ष्य केले आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दुबई, अबुधाबी, दोहा आणि सौदीची राजधानी रियाधचे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाही हे अरब देश इराणवर प्रतिहल्ला का करत नाहीत? अमेरिकेला आपले एअरबेसेस वापरण्याची परवानगी का नाकारली आहे? यामागील महत्त्वाची कारणे समोर आली आहेत.

इराण अरब देश युद्ध (Iran Arab Countries War)

मिडल ईस्ट संकट (Middle East Crisis Marathi News)

सौदी अरेबिया इराण संघर्ष (Saudi Arabia Iran Conflict)

इराणचे हल्ले (Iran Attacks on UAE Qatar)

मराठी बातम्या (Marathi News Today)

१. इराण ‘प्रो-इस्त्राईल’ प्रतिमा तयार होण्याची भीती

अरब देश इराणवर हल्ला का करत नाहीत, याचे पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रतिमा. इराण आणि इस्त्राईल हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. गेल्या तीन वर्षांपासून इस्त्राईल-हमास संघर्ष सुरू असून, इराणने सातत्याने पॅलेस्टाईन आणि हमासची बाजू घेतली आहे. अरब देशही पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर इस्त्राईलचा निषेध करत आले आहेत. जर आता अरब देशांनी इराणवर हल्ला केला, तर “हे देश इस्त्राईलच्या बाजूने उभे आहेत,” असा संदेश मुस्लीम जगतात जाईल. यामुळे या देशांतील नागरिक स्वतःच्याच सरकारविरुद्ध बंड करण्याची शक्यता आहे.

२. ‘मुस्लिम उम्मा’ची संकल्पना

दुसरे कारण म्हणजे ‘मुस्लिम उम्मा’ (जागतिक मुस्लीम एकता). मुस्लीम धर्मात शिया आणि सुन्नी असे दोन गट असून इराण (शिया) आणि सौदी (सुन्नी) यांच्यात वर्षानुवर्षांचे मतभेद आहेत. मात्र, जेव्हा संघर्ष मुस्लीम विरुद्ध बिगर-मुस्लीम (इस्त्राईल/अमेरिका) असा असतो, तेव्हा सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याची ही संकल्पना आहे.

यापूर्वी १९८९ मध्ये इराणचे सर्वोच्च नेते रुहल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर, कट्टर शत्रू असूनही इराकचे सद्दाम हुसेन यांनी शोक व्यक्त केला होता. तोच कित्ता आताही गिरवला जाण्याची शक्यता आहे. इस्त्राईलविरुद्ध लढणाऱ्या इराणवर हल्ला करून मुस्लीम एकतेत फूट पडू नये, असा विचार अरब देश करत आहेत.

३. अर्थव्यवस्थेला बसणारा मोठा फटका

तिसरे व्यावहारिक कारण म्हणजे अर्थव्यवस्थेचे नुकसान. इराणने आधीच धमकी दिली आहे की, जर अरब देशांनी हल्ला केला तर ते थेट राजवाडे आणि ऑईल रिफायनरीज (तेल शुद्धीकरण प्रकल्प) यांना लक्ष्य करतील. सौदी अरेबिया, युएई या देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे तेल आणि पर्यटनावर अवलंबून आहे. अरामको सारख्या तेल कंपन्यांवर हल्ला झाल्यास या देशांच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडू शकतो. याउलट, इराणवर अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय निर्बंध असल्याने तो देश ‘सेल्फ सफिशियंट’ झाला असून युद्धाचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर फारसा फरक पडणार नाही.


आता परिस्थिती बदलणार?

इतके दिवस संयम राखल्यानंतर आता अरब देशांचा संयम सुटताना दिसत आहे. कतारने चार दिवस सतत होणाऱ्या हल्ल्यांनंतर इराणला प्रतिहल्ल्याची गंभीर धमकी दिली आहे. सौदी अरेबियानेही आपली संरक्षण यंत्रणा सज्ज केली आहे. जर आता अरब देश प्रत्यक्ष युद्धात उतरले, तर मिडल ईस्टमध्ये ‘फुल स्केल’ युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तुमचे मत काय? अरब देशांनी इराणला सडेतोड उत्तर द्यायला हवे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.


ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा आमचा ब्लॉग.

Exit mobile version